Sukanya Samriddhi big announcement : जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकार विविध उपक्रम, लोकोपयोगी योजना राबवत असते. त्या पार्श्वभूमीवर मुलींची घटती लोकसंख्या पाहता मुलींचा जन्मदर वाढावा, भ्रूणहत्या थांबाव्या यासाठीही सरकार प्रयत्नरत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही बचत केलेली अल्पशी बचत व्याजासह मोठ्या रूपात मिळू शकते. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवी योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामधील लहान बचत योजनांमध्ये व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत. (web title : Central Modi Government Small Saving Schemes Hike Sukanya Samriddhi Yojana Scheme Interest Rates For Jan To March)

New Delhi : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशवासीयांना गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये काही योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. तीन वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवी योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. परंतु यातील लहान बचत योजनांमध्ये व्याजदर कायम ठेवले आहेत.

पीएफचे व्याजदर तीन वर्षांपासून जैसे थे :

केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर वाढवला आहे. याआधी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8 टक्के आहे. तर तीन वर्षांच्या टीडीचा व्याजदर हे 7.1 टक्के होते. विशेष म्हणजे (Public Provident Fund) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेच्या व्याजदरात दरात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आला नाही. पीएफ योजनेच्या व्याजदरातील शेवटचा बदल एप्रिल-जून 2020 मध्ये झाला होता. त्यावेळी याचा व्याजदर घटवला होता. हा व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के केला आहे. गेल्या वेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेतही बदल केला नव्हता.

जानेवारी-मार्च 2024 चे व्याजदर असे :

केंद्र सरकारने विविध योजनांच्या व्याजदरात बदल केला आहे. त्यामध्ये पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के व्याज एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर ६.९ टक्के 2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के ३ वर्षांच्या ठेवींवर ७.१ टक्के व्याजदर 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे. 5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के, किसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के, सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज ८.२ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के आहे. मासिक उत्पन्न खाते व्याजदर 7.4 टक्के राहणार आहे.

या योजनांच्या व्याजदरात बदल नाही :

सरकारने जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी फक्त सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजात (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदतींच्या ठेवीमध्ये वाढ केली आहे. उर्वरित सर्व लहान बचत योजनांमध्ये कोणताही बदल केला नाही. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या योजनेवरील व्याज हे बँक एफडीपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात केलेला बदल निश्चितच मुलीच्या बापाला दिलासा देणारा ठरणार आहे.